Tue, Apr 23, 2019 06:15होमपेज › Satara › दुर्बिणीने काढला 9 सेमीचा किडनी स्टोन

दुर्बिणीने काढला 9 सेमीचा किडनी स्टोन

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 16 2018 9:02PMकराड : प्रतिनिधी

आधुनिक युगात सर्वच क्षेत्रामध्ये बदल होत असताना वैद्यकीय क्षेत्र ही त्याला अपवाद राहिलेले नाही. आधुनिक तंत्रज्ञानाला अनुसरूनच अनुभवी युरो-सर्जन डॉ. योगेश जाधव यांनी नुकतीच एक शस्त्रक्रिया केली. ज्यामध्ये  9 सेंटीमीटरचा किडनी स्टोन दुर्बिणीद्वारे बिन टाक्यांची शस्त्रक्रियेने काढून टाकण्यात आला. या शस्त्रक्रियेमुळे सह्याद्री हॉस्पिटलच्या लौकिकात भर पडली आहे 

किडनी स्टोन हा सर्वसामान्यामध्ये आढळणारा अत्यंत वेदनादायक आजार आहे. हा आजार 25 ते 45 या वयोगटामध्ये सामान्यतः आढळून येतो. पुरुषांमध्ये हा आजार स्त्रियांच्या तीन पटीने अधिक प्रमाणात आढळतो.  सुदाम पाटील या 45 वयाच्या व्यक्तीस 9 सेंटीमीटरचा किडणी स्टोन झालेला होता. यावर उपचार करण्यासाठी पाटील यांनी अनेक डॉक्टरांची भेट घेतली. काहींनी टाक्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

तर काहींनी किडनी काढून टाकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पाटील यांनी डॉ. योगेश जाधव यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी पाटील यांची तपासणी करून हा खडा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून काढला जाऊ शकतो असे सांगितले. पी. सी. एन. एल. या दुर्बिणीद्वारे करण्यात येणार्‍या शस्त्रक्रियेमध्ये खडा फोडून खड्याची पावडर करून बाहेर काढून टाकण्यात येते. या प्रक्रियेमध्ये कोणतेही टाके घालावे लागत नाही. टाक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये बरकडीचे हाड काढावे लागते व 10 ते 15 टाके घालावे लागतात. 

याशिवाय रुग्णाला महिनाभर विश्रांती घ्यावी लागते. याउलट दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतीही चिरफाड करावी लागत नाही. कोणतेही टाके घालावे लागत नाहीत. तसेच रुग्ण चार ते पाच दिवसातच कामावर रुजू होतात. विशेष म्हणजे डायबेटिस रुग्ण व हृदय विकाराचे रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर व सुरक्षित शस्त्रक्रिया आहे. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मूत्ररोग तपासणी संबंधित अनेक उपचार केले जातात व महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजनेअंतर्गत मूत्रविकार शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.

Tags : kidney stone, removed ,telescope