Fri, May 24, 2019 08:57होमपेज › Satara › कराडात ८१.४१ टक्के मतदान

कराडात ८१.४१ टक्के मतदान

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 27 2018 10:52PMकराड : प्रतिनिधी 

कराड तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी शांततेत सरासरी 81.41 टक्के मतदान झाले. टेंभूत सर्वाधिक 93. 46 टक्के तर सर्वात कमी मतदान येवतीमध्ये 72.39 टक्के इतके झाले आहे. बुधवारी सकाळी कराडमध्ये मतमोजणी होणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी केले आहे.

तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणार्‍या रेठरे बुद्रूकसह टेंभू, येवती, शेळकेवाडी (येवती), पिपंरी, हेळगाव, येणपे या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर तांबवे, कोरिवळे, नडशी आणि चिखली या गावातही पोटनिवडणूक झाली.

सकाळी साडेसात वाजल्यापासून सर्वच 34 मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुमार 77 टक्क्याहून अधिक मतदान झाले होेते. दुपारपर्यंत पंचवार्षिक निवडणुकीसाठी 13 हजार 688 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर पोटनिवडणुकीसाठी 77. 48 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे अखेरच्या दोन तासात सर्वच ठिकाणी मोठी चुरस पहावयास मिळाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हेळगावमध्ये 84.60 टक्के, पिपंरीत 91.30 टक्के, रेठरे बुद्रूकमध्ये 79.24 टक्के, शेळकेवाडीत (येवती) 86.88 टक्के, येवतीमध्ये 72.39 टक्के, येणपेत 78.17 टक्के, टेंभूत 93.46 टक्के, नडशी पोटनिवडणुकीत 94.32 टक्के, चिखलीत 81.91 टक्के, तांबवेत 81.12 टक्के तर कोरिवळेत 87.90 टक्के मतदान झाल्याचे तहसिलदारांकडून सांगण्यात आले.