होमपेज › Satara › फलटणमध्ये ८ पशुवैद्यकीय दवाखान्यांना मंजुरी :  जानकर

फलटणमध्ये ८ पशुवैद्यकीय दवाखान्यांना मंजुरी :  जानकर

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 07 2018 8:25PMविडणी : वार्ताहर

फलटण तालुक्यात पशुधन संख्या जादा असल्याने पशुवैद्यकीय दवाखाना संख्या 13 असून यामध्ये वाढ करावी, अशी लोकांची मागणी आहे. त्यासाठी फलटण तालुक्यात 8 दवाखान्यांची मंजूरी दिली असून त्यामध्ये  फरांदवाडी व आदर्की या ठिकाणी दवाखाना मंजूरी मिळाली असल्याची माहिती दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री ना. महादेव जानकर यांनी दिली.

विडणी ता.फलटण येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी  यांस आय,एस.ओ.मानांकन प्राप्त झाल्याने दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंञी महादेवजी जानकर यांनी दवाखान्यास सदिच्छा भेट घेऊन दवाखान्याची पाहणी केली. यावेळी  पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सी.टी.भोसले यांनी दिली.पशुवैद्यकीय विभागाने चांगल्या पध्दतीने योगदान देऊन सर्वानी युनिटीने काम केल्याने या विभागाचा भारतात नंबर आल्याचे मत जानकर यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ विनोद पवार, डॉ.संदिप भुजबळ, डॉ चंद्रशेखर भोसले, रासपचे डॉ.उत्तमराव शेंडे अँड. साहेबराव जाधव, काशिनाथ शेवते, संतोष ठोंबरे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सुवर्णा नाळे, लक्ष्मण भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. जानकर म्हणाले, 8 दवाखान्यांना मंजूरी मिळाली आहे. मात्र, आदर्की ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करुन न दिल्याने तो दवाखाना वाई किंवा खंडाळा तालुक्यात वर्ग करणार आहे. फरांदवाडी येथील दवाखाना मिनिपॉली क्लिनिक असून या ठिकाणी रक्त लघवी एक्सरे आदींची तपासणी करणेत येणार आहे. जनावरांच्या विविध आजारावर उपचार या ठिकाणी केले जातील असेही यावेळी जानकरांनी सांगितले.

जानकर म्हणाले, पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर कडून पशुपालकांना पशुपालन, कुक्कुट पालन,मत्स्य पालन कसे करावे या विषयी प्रशिक्षण दिले जाईल. जनावरांपासून होणारे आजार याचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी पशुपालकांना लसीकरण केले जाईल. पूर्वी जनावरांच्या तपासणी जिल्ह्याच्या ठिकाणी होत असत आता प्रत्येक तालुक्यात तपासणी केंद्र सुरु करत आहे. यामुळे पशुपालकांचा वेळ व आर्थिक खर्च यांची बचत होणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधेसह मोबाईल व्हँन सुरु करणार असून यामुळे पशुपालकांना डॉक्टरांना फोन करुन जनावरांच्या आजाराची माहिती दिल्यास थेट पशुपालकांच्या दारात डॉक्टर जाऊन सेवा दिली जाणार आहे.