Thu, Mar 21, 2019 16:03होमपेज › Satara › सावकारीप्रकरणी ८ जणांवर गुन्हा

सावकारीप्रकरणी ८ जणांवर गुन्हा

Published On: May 20 2018 1:44AM | Last Updated: May 19 2018 10:45PMफलटण : प्रतिनिधी

सावकारी व मारहाणप्रकरणी फलटण तालुक्यातील 8 जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर हा गुन्हा फलटण शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सूरज मोहन पवार (वय 22, रा. महतपुरा पेठ, फलटण) याने 2016 मध्ये सुनील माणिक जाधव ऊर्फ मुन्‍ना याच्याकडून 15 टक्के व्याजाने 1 लाख 40 हजार रुपये घेतले होते. मात्र, पहिल्याच महिन्यात व्याज थकल्याने सुनील जाधव याच्यासह गब्बर माणिक जाधव, गणेश भोसले, सूरज पवार, इजान बागवान व तीन अनोळखी युवक यांनी सूरज पवार यांना 63 गुंठे जमीन गहाणखत करून देण्याची मागणी केली. याला सूरज पवार यांनी नकार दिला. मात्र, सुनील जाधव याने सूरज यांची 63 गुंठे जमीन परस्पर आपल्या नावे करून घेतली.

याचा जाब विचारण्यासाठी सूरजचे वडील  गेले असता त्यांना मारहाण केली. तसेच 29 एप्रिल रोजी सुनील जाधव याच्या ओळखीच्या दोन युवकांनी पवार यांच्या घरात घुसून जबरदस्तीने सूरज यांच्या आईकडील 11 हजार रूपये नेले. याप्रकरणी सूरज पवार यांनी फिर्याद दिली असून तपास पीएसआय मुंढे करत आहेत.