होमपेज › Satara › सातारा जिल्ह्यात 77 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

सातारा जिल्ह्यात 77 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

Published On: Mar 06 2018 7:54PM | Last Updated: Mar 06 2018 7:48PMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गळती हंगाम चांगलाच बहरात आला आहे. हंगामाने अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली असताना  जिल्ह्यात आजअखेर 66 लाख 12 हजार 284 मे.टन उसाचे गाळप होवून 77 लाख 21 हजार 280 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचा सरासरी साखर उतारा 11.68 पडला आहे.

जिल्ह्यातील साखर कारखाने चांगलेच जोषात आहेत.ऊस उत्पादकांची दराची मागणी अद्यापही पूर्णत्वास गेली नसली तरी गाळप मात्र दणक्यात सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी यामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे. श्रीराम जवाहर फलटण कारखान्याने 3 लाख 39 हजार 680 टन उसाचे गाळप करून 3 लाख 88 हजार 250 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने 8 लाख  12 हजार 540 टन उसाचे गाळप करून 10 लाख 9  हजार 360 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. किसनवीर सहकारी साखर कारखान्याने 4 लाख 88 हजार 270 टन उसाचे गाळप करून 5 लाख 62 हजार 840 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. लोकनेते बाळासाहेब देसाई  साखर कारखान्याने

1 लाख 77 हजार 170  टन उसाचे गाळप करून 2 लाख 6 हजार 750 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सह्याद्री साखर कारखान्याने 9 लाख 5 हजार 700 टन उसाचे गाळप करून 11 लाख 11 हजार 100क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने 4 लाख 45  हजार 260 टन उसाचे गाळप करून 5 लाख 23 हजार 950क्विंटल साखरेचे उत्पादन केले. रयत सहकारी साखर कारखान्याने 3 लाख 30 हजार 110 टन उसाचे गाळप करून 3 लाख 84 हजार 790 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.खंडाळा तालुका सहकारी साखर कारखान्याने 2 लाख 8 हजार 590 टन उसाचे गाळप करून 2 लाख 29 हजार 300 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. न्यू फलटण कारखान्याने 2 लाख 76हजार 363.2 टन उसाचे गाळप करून 2 लाख 94 हजार 200 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.

जयवंत शुगरने 4 लाख 66हजार 460 टन उसाचे गाळप करून 5 लाख  90 हजार 350 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.ग्रीन पॉवर शुगर लिमीटेडने 4 लाख 56  हजार 685 टन उसाचे गाळप करून 5 लाख34 हजार 140 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.स्वराज्य इंडिया अ‍ॅग्रो लिमिटेडने 3 लाख 69 हजार 330 टन उसाचे गाळप करून 3 लाख 71 हजार 930 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.शरयु शुगर लिमिटेडने 6 लाख 71 हजार695 टन उसाचे गाळप करून 7 लाख 43 हजार 900 क्विटंल साखरेचे उत्पादन झाले.जरंडेश्‍वरने 6 लाख 64 हजार 430 टन उसाचे गाळप करून 7 लाख 70हजार 420 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.