Fri, May 24, 2019 02:54होमपेज › Satara › आरेवाडीच्या दिंडीला ५० वर्षांची परंपरा

आरेवाडीच्या दिंडीला ५० वर्षांची परंपरा

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 9:17PMकराड : प्रतिनिधी 

आरेवाडी, ता. कराड येथे 1967 पासून वारकरी दिंडीची परंपरा आहे. जुन्या जाणत्या लोकांनी तरूणवर्गाला अध्यात्म्याची गोडी लावली. त्यावेळचा तरूणवर्ग पंढरपूरला आठ दिवस जावून रहायचे. 2002 पर्यंत अशापध्दतीने लोक पंढरीला जायचे. त्यानंतर 2002 पासून तांबवे येथून विभागातील दिंडीचे प्रस्थान सुरू झाले व 2004 पासून ेेप्रथम आरेवाडी ते पंढरपूर असा दिंडीला प्रारंभ झाला. 50 वर्षांपासून येथे वारकरी सांप्रदाय जोपासला जातो. 

पूर्वी स्व. अंतुबुवा, महादेव, राजाराम आबाबुवा, पांडुरंग बुवा, नारायण बुवा, यशवंत आण्णा, गोपुदादा, बंडुदादा, बाळु कणसे, पांडुबुवा साळुंखे यांनी 1967 सालापासून आरेवाडीमध्ये वारकरी जोपासला. तरूणांमध्ये अध्यात्माची गोडी निर्माण केली. त्यामध्ये रामचंद्र यादव, दिलीप देसाई, नाथा देसाई, सुरेश पाटील,  दिलीप यादव,  जगन्नाथ यादव, दिनकर यादव, एकनाथ चव्हाण, निवृत्ती महाराज, दादा महाराज, सुभाष महाराज  आदींनी कीर्तन, एकतारी भजनास गावात प्रारंभ केला. 2004 पासून आरेवाडी पासून दिंडीस प्रारंभ झाल्यानंतर याचे संचलन ह.भ.प. रामदास महाराज यांनी केले. महिला भजनी मंडळही स्थापन झाले.

त्यांच्या घरातच वारकरी परंपरा असल्याने गुरूवर्य बंडातात्या कराडकर व मारूतीबुवा कराडकर मठामध्ये त्यांनी शिक्षण घेतले. सोहळ्याला रामचंद्र महाराज यांच्या पादुका ग्रामस्थ घेऊन जात. रामचंद्र महाराज डोळ्याने अंध होते. घरात वारकरी परंपरा 1967 पासून  जोपासली गेली. त्यांच्या नावाने रामबुवा आरेवाडीकर दिंडी काढली जाते. त्यांच्या मुलाने पालखी दान केली. त्यानंतर भिमराव जाधव यांनी लहान रथ, कै. समाधान शिंदे यांनी ज्ञानेश्‍वर महाराज यांची मुर्ती व मोठा रथ, मोरेमामा, लक्ष्मण देसाई यांनी रथासाठी रक्‍कम दिली.  भिमराव जाधव यांनी विठ्ठल, रूक्मिणी यांची मुर्ती दिली. या दिंडीचा स्वत:चा मठ आहे. मठाधिपती म्हणून हभप किसन बंडु देसाई आहेत. सोहळ्यास केसे, वनवासमाची, काजारवाडी आदी भाविक सहकार्य करतात.