Sun, Mar 24, 2019 06:35होमपेज › Satara › सातारा : हायवेवर ५० हजाराची  दारू जप्त

सातारा : हायवेवर ५० हजाराची  दारू जप्त

Published On: Feb 24 2018 3:31PM | Last Updated: Feb 24 2018 3:31PMसातारा : प्रतिनिधी

टिटवेवाडी ते मसूर रोडवर बेकायदा दारु वाहतुक करणार्‍ टोळीचा पोलिसांच्या पथकाने पर्दाफाश केला. प्रोबेशनरी पोलिस अधीक्षक पवन बनसोड व पोलिस उपअधीक्षक नंदा पाराजे यांनी सापळा रचून  ५० हजार रुपयांची दारु व कार असा एकूण १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

प्रमोद उत्तम शिंदे (वय ३५, रा.टिटवेवाडी ता.सातारा) व शकीला गुलाब मुलाणी (वय ५०, रा.देशमुखनगर) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. 

महामार्गावर दारुची वाहतुक होत असल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री ८ वाजता सापळा लावला. एमएच ११ बीव्ही ६९९८ ही ओमनी कार बाबात पोलिसांना संशय आल्याने  पोलिसांनी कार अडवली. वाहनामध्ये पाहणी केली असता दारुची बॉक्स निदर्शनास आली. पोलिसांनी कार बाजूला घेवून दारुची पाहणी केली असता ते ५० बॉक्स होते. पोलिसांनी संशयिताकडे चौकशी केल्यानंतर ते वाहन संशयित आरोपी शकीला मुलाणी हिचे असल्याचे समोर आले. पोलिसांनी दारु व कार ताब्यात घेवून बोरगाव पोलिस ठाण्यामध्ये आणले. गुन्हा दाखल करुन दारु जप्त केली.

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध दारुबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.