Tue, Jul 23, 2019 02:01होमपेज › Satara › जिल्ह्यात ४७ हजार किलो प्लास्टिक जमा

जिल्ह्यात ४७ हजार किलो प्लास्टिक जमा

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 10:23PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील लोकांना मुलभूत सुविधा पुरवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने प्लास्टिक संकलन उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यात 1 हजार 492 ग्रामपंचायतीमध्ये  सुमारे 47  हजार 374 किलो प्लास्टिक गोळा करण्यात यश आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.

सातारा तालुक्यातील 194 ग्रामपंचायतीमध्ये 344 शाळा महाविद्यालयातील  9 हजार 812 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून 10 हजार 359 किलो प्लास्टिक जमा केले. कोरेगाव तालुक्यातील 142 ग्रामपंचायतीमध्ये 256 शाळा महाविद्यालयातील 39 हजार 596 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून 3 हजार 70 किलो प्लास्टिक जमा केले. खटाव तालुक्यातील 132 ग्रामपंचायतीमध्ये 327 शाळा महाविद्यालयातील  22 हजार 533 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून 1 हजार 730 किलो प्लॅस्टिक जमा केले.

माण तालुक्यातील 95 ग्रामपंचायतीमध्ये 291 शाळा महाविद्यालयातील 11 हजार 270 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून 1 हजार 675 किलो प्लॅस्टिक जमा केले. फलटण तालुक्यातील 128 ग्रामपंचायतीमध्ये 319 शाळा महाविद्यालयातील  25 हजार 819 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून 3 हजार 77 किलो प्लॅस्टिक जमा केले. खंडाळा तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीमध्ये 157 शाळा महाविद्यालयातील 12 हजार 562 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून 568 किलो प्लॅस्टिक जमा केले. वाई तालुक्यातील 99 ग्रामपंचायतीमध्ये 225 शाळा महाविद्यालयातील  10 हजार 748 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून 1 हजार 352 किलो प्लॅस्टिक जमा केले.

महाबळेश्‍वर तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीमध्ये 135 शाळा महाविद्यालयातील 3 हजार 451 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून 174 किलो प्लॅस्टिक जमा केले. जावली तालुक्यातील 125 ग्रामपंचायतीमध्ये 237 शाळा महाविद्यालयातील  11 हजार 237 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून 3 हजार 125 किलो प्लॅस्टिक जमा केले. कराड तालुक्यातील 199 ग्रामपंचायतीमध्ये 437 शाळा महाविद्यालयातील  63 हजार 584 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून 11 हजार 478 किलो प्लॅस्टिक जमा केले. पाटण तालुक्यातील 236 ग्रामपंचायतीमध्ये 599 शाळा महाविद्यालयातील  13 हजार 873 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून 10 हजार 766 किलो प्लॅस्टिक जमा केले.