Mon, Jun 17, 2019 02:12होमपेज › Satara › जनआरोग्य योजनेचा 42 हजार रुग्णांना लाभ

जनआरोग्य योजनेचा 42 हजार रुग्णांना लाभ

Published On: May 11 2018 1:44AM | Last Updated: May 10 2018 11:33PMउंडाळे : वैभव पाटील

दारिद्य्र रेषेखालील व आर्थिक दुर्बल घटकातील जनतेला उत्तम व अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळावी म्हणून गेल्या 4 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून महात्मा फुले जनआरोग्य योजना असे नवे नामकरण करण्यात आले असून या योजनेचा लाभ सातारा जिल्ह्यातील 42 हजार 550 रुग्णांना देऊन 100 कोटी रुपये अधिक आर्थिक मदत झाली आहे. यामुळे ही योजना जनतेच्या आरोग्याची संजिवनी बनली आहे. 

5 नोव्हेंबर 2013 मध्ये काँग्रेस आघाडी सरकारने सामान्य व गरजू आर्थिक दुर्बल नागरिकांचा आर्थिक कारणाने उपचार न झाल्याने मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. या आरोग्य योजनेची व्याप्ती दिवसें-दिवस वाढत असून सातारा जिल्ह्यात या योजने अंतर्गत  21 हजार गरजूंनी 55 कोटी रुपयांचा लाभ घेतला.

2017 मध्ये या योजनेचा लाभ जिल्ह्यातील 50 हजार 430 गरजू रूग्ण लाभार्थ्यांना झाला व या रूग्णांना 115 कोटी 55 हजार 850 रूपयांची आर्थिक मदत झाली आहे. सातारा जिल्ह्जातील हॉस्पिटलमधून ही सेवा दिली जात असून भविष्यात रूग्णालयाची संख्या वाढवण्याचा शासनाचा विचार आहे. त्यामुळे गरजू रूग्णांना आता जवळच्या हॉस्पिटलमध्ये चांगले व महागडे उपचार मिळतील.
सातारा जिल्ह्यातील 14 हॉस्पिटलमधून या योजनेचे उपचार दिले जातात.  यामध्ये सिव्हील  हॉस्पिटल, सातारा  यशवंत हॉस्पिटल, सातारा ओकलाइफ कॅन्सर हॉस्पिटल शेंद्रे,  संजीवनी हॉस्पिटल सातारा, कृष्णा हॉस्पिटल कराड, सह्याद्री हॉस्पिटल कराड, शारदा क्लिनीक हॉस्पिटल कराड, कोळेकर हॉस्पिटल कराड, गोरडेकर हॉस्पिटल वाई, सावित्री हॉस्पिटल लोणंद, बी. जी. काटकर हॉस्पिटल वडूज, लाईफ लाईन हॉस्पिटल फलटण, निरोप व सुश्रृत  हॉस्पिटल फलटण यांचा या योजनेत समावेश आहे. या  सर्व 14 हॉस्पिटलमधून 50 हजार 830 रुग्णांनी उपचार घेत 115 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे उपचार घेेतले. 

या योजनेत 30 स्पेशालिटी उपचार अंतर्गत 971  आजारावर उपचार केले जातात. यात हृदय विकार, मेंदू विकार यासह पोटाचे विकार, हाडांचे उपचार, कॅन्सर यासह 900 पेक्षा अधिक रोगांचा समावेश आहे. या योजने अंतर्गत दीड लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. 

सातारा जिल्ह्यातील एकूण 14 हॉस्पिटल
सातारा : सिव्हिल हॉस्पिटल, यशवंत हॉस्पिटल, ओक लाईफ कॅन्सर (शेंद्रे), संजीवनी हॉस्पिटल. 

कराड : कृष्णा हॉस्पिटल, सहयाद्री हॉस्पिटल, शारदा हॉस्निटल, कोळेकर हॉस्पिटल. 

वाई : घोटवडेकर हॉस्पिटल. 

लोणंद : संजीवनी हॉस्पिटल. वडुज : बी.जे. काटकर हॉस्पिटल. फलटण : लाईफलाईन हॉस्पिटल, सुश्रृत हॉस्पिटल, निकोव फलटण . 2013 मध्ये योजना सुरू झाली
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना हे या योजनेचे पहिले नाव होते. पण 2016 साली भाजप आघाडी सरकारने या योजनेचे नाव बदलून महात्मा फुले जन आरोग्य योजना हे ठेवले आहे. ही योजना नोव्हेंबर 2013 साली राजीव गांधी यांच्या नावे सुरू केली.