सातार्‍यात एका रात्रीत ४१ जण पॉझिटिव्ह 

Last Updated: May 23 2020 9:31AM
Responsive image


 सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातार्‍यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. शुक्रवारी तर बळीचावार ठरला असतानाच शुक्रवारच्या संध्येला तब्बल ४१ जणांचे रिपोर्ट कोरोना बाधित आल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा २४२ झाला आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे जिल्हावासियांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार घातला आहे. मंगळवार, बुधवार व गुरुवार नंतर आता शुक्रवारीही जिल्ह्याला धक्का दिला आहे. एकारात्रीत तब्बल ४१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून यामध्ये सातारा तालुक्यात ५, फलटण तालुक्यात ४, पाटण तालुक्यात १८, वाई तालुक्यात १, माण तालुक्यात ३, खंडाळा तालुक्यात ४, कोरेगाव तालुक्यात ३, कराड तालुक्यात ३ यासह अन्य तालुक्यातील कोरोना बाधित मिळून आले आहेत. त्यातला एक लोधवडे ( ता. माण ) येथील मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह निघाला आहे तर एकजण पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे.