Thu, Jul 18, 2019 13:09होमपेज › Satara › चाळीस जुगारबहाद्दरांना अटक

चाळीस जुगारबहाद्दरांना अटक

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 10:48PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरासह परिसरात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करून तीन जुगार अड्ड्यांवर छापा टाकून तब्बल 40 जुगारबहाद्दरांना अटक केली. धक्‍कादायक बाब म्हणजे, संशयितांमध्ये तडीपार गुंडांचाही समावेश आहेे. राजधानी टॉवर्स परिसर, मोळाचा ओढा या ठिकाणी बुधवारी रात्री उशिरा या कारवाया सुरू होत्या. पोलिसांनी  या कारवाईत सुमारे 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. दरम्यान, नूतन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांचे दणक्यात आगमन झाल्यानंतर  गुंडांपुंडांची तंतरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी रात्री सातारचे पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या पथकाला सातार्‍यात ठिकठिकाणी जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनेची व्याप्‍ती पाहून पोलिसांचे     पथक केले व सायंकाळी दोन पथकाच्या माध्यमातून राजधानी टॉवर्स व मोळाचा ओढा येथील फ्लॅट, बंगल्यात जुगारबाजांचा अड्डा भरत असल्याचे समजले. हे अड्डे  समीर कच्छी याच्यासह काही जणांचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.त्यानुसार पोलिसांनी कारवाईचा फास आवळत पूर्ण बंगल्याला हेरले. जुगार अड्डा सुरु असलेल्या ठिकाणी पोलिस घुसताच जुगारबहाद्दरांची तंतरली.

पोलिसांना पाहताच संशयित आरोपींना पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सर्वांच्या मुुसक्या आवळल्या. अशाच पध्दतीने मोळाचा ओढा येथेही कारवाई राबवण्यात आली. या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी घटनास्थळावरुन रोख रक्‍कम, जुगाराचे साहित्य, दुचाकी व इतर असा सुमारे 2 लाख रुपयांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्‍त केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयितांना पोलिसांच्या पिंजरा व्हॅनमधून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. कारवाईमध्ये ताब्यात घेतलेल्यांमध्ये काही तडीपार गुंडांचाही समावेश असल्याचे समोर आले असून अनेक  रथीमहारथींचा त्यामध्ये समावेश आहेे. दरम्यान, रात्री उशीयापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

दरम्यान, बुधवारी दुपारीच नुतन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सातारचा चार्ज घेतला आहे. अशावेळी सायंकाळी धडाकेबाज कारवाई झाल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.