Mon, May 20, 2019 11:10होमपेज › Satara › सातार्‍यात मोबाईलद्वारे 38 लाखांची फसवणूक

सातार्‍यात मोबाईलद्वारे 38 लाखांची फसवणूक

Published On: Aug 15 2018 1:26AM | Last Updated: Aug 15 2018 12:48AMसातारा : प्रतिनिधी

मोळाचा ओढा येथील एका कंपनीच्या मॅनेजरला मोबाईलवर एक मेसेज आल्यानंतर त्या मेसेजवर फोन लावताच कंपनीचे चक्‍क 37 लाख 78 हजार रुपये ट्रान्स्फर झाले असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहेे. हॅकरच्या माध्यमातून मोबाईल स्वाईपद्वारे हे पैसे कॅनडासह आणखी एका देशात गेले असल्याचे समोर आले आहे.  

विलास मारुती सोनमळे (वय 63, रा.पांढरवाडी, कोडोली, सातारा) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोळाचा ओढा येथे अभिजित इक्‍विपमेंट व अभिजित इंजिनिअर्स या नावाच्या दोन कंपनी आहेत. सचिन दोशी हे या कंपनीचे मालक आहेत. तक्रारदार विलास सोनमळे हे गेल्या काही वर्षापासून या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. कंपनीकडून सर्वांना एकाच कंपनीचे सिम कार्ड देण्यात आले असून त्यावर बँकीग ट्रान्झिशनही केले जाते.

दि. 12 रोजी मॅनेजर विलास सोनमळे हे ऑफिसमध्ये काम करत होते. यावेळी त्यांच्या मोबाईवर एक मेसेज आला. मोबाईलवरील तो मेसेज वाचल्यानंतर त्यावर एक क्रमांक देण्यात आला होता. या क्रमांकावर फोन लावला व त्यानुसार पुढील प्रक्रिया केली. दुसर्‍या दिवशी म्हणजेच दि. 13 रोजी बँकेतील पदाधिकार्‍याचा मॅनेजर यांना फोन आला व बँकेतून मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले. मात्र मॅनेजर यांनी कोणताही व्यवहार केला नसल्याचे सांगितले. यावर कंपनीच्या मॅनेजर तत्काळ बँकेत गेले. त्यांनी सर्व ट्रान्झिशन पाहिले एका कंपनीवरुन 25 लाख तर दुसर्‍या कंपनीवरुन 12 लाख 78 हजार रुपये असे एकूण 37 लाख 78 हजार रुपये त्रयस्ताच्या खात्यावर जमा झाले असल्याचे निदर्शनास आले. या सर्व प्रकारामुळे मॅनेजर गोंधळून गेले व त्यांनी कंपनीच्या मालकाला याबाबतची माहिती दिली. शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून याबाबतची माहिती दिल्यानंतर याप्रकरणी अज्ञाताविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शाहूपुरी पोलिस ठाण्याची हद्द असल्याने हा गुन्हा झिरोने वर्ग करण्यात आला.

या मेसेजपासून रहा सावध...

तक्रारदार विलास सोनमळे यांच्या मोबाईलवर ‘एझेड एअरसीसीएम’ या नावाने ‘अपडेट ऑन सिम चेंज फॉर युवर एअरटेल मोबाईल (मोबाईल क्रमांक) ऑर्डर ऑन रजिस्टरर्ड फॉर सिम चेंज फ्रॉम इफ यू हॅव नॉट रिक्‍वेस्टेड फॉर सिम चेंज प्लीझ कॉल 121’ अशा आशयाचा मेसेज आला. मोबाईलवर आलेल्या या मेसेजवरुन मॅनेजर यांनी त्यानुसार प्रक्रिया केली. हीच प्रोसेस फसवणुकीला आमंत्रण ठरली. कारण हा मेसेज बँक, मोबाईल कंपनीने पाठवलेला नव्हता तर फॉड करणार्‍यांनी परदेशातून पाठवला होता. मोबाईलवरील प्रोसेसमुळे संशयित आरोपींना बँकेचे डिटेल्स मिळाले व त्यानुसार फसवणूक झाली असल्याचे समोर आले.