Tue, Sep 25, 2018 14:53होमपेज › Satara › लाईट गुल; चोरट्यांचा 30 तोळे सोन्यावर डल्ला

लाईट गुल; चोरट्यांचा 30 तोळे सोन्यावर डल्ला

Published On: Jun 25 2018 10:44AM | Last Updated: Jun 25 2018 10:44AMशिवथर (सातारा) : वार्ताहर

सातारा तालुक्यातील शिवथर येथे रविवारी मध्यरात्री लाईट गेल्यानंतर अज्ञात चोरट्यानी संधीचा गैरफायदा घेऊन तब्बल 30 तोळे सोने चोरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी ठसे तज्ञ, श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली आहे.

जयवंत साबळे रा. शिवथर यांच्या घरी चोरी झाली आहे. रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपी गेले होते. साबळे यांचे घर दुमजली आहे. रात्री 2 वाजता लाईट गेली व सोमवारी पहाटे 6 वाजता लाईट आली. तिजोरी ज्याठिकाणी होती त्या खोलीत रात्री कोणीही झोपायला नव्हते.

सोमवारी सकाळी त्या खोलीत गेल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. तिजोरीत असणारे सोन्याचे ड्रॉव्हरच चोरट्यांनी चोरून नेला होता. प्राथमिक माहितीनुसार त्यामध्ये सोन्याचे गंठण, मोहनमाळ, अंगठ्या, सोन्याची चेन, फुले असा लाखो रुपयांचा ऐवज होता.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे.