Sat, Jun 06, 2020 10:34होमपेज › Satara › फलटणमध्ये बिल्डरकडून २५ लाखांची फसवणूक 

फलटणमध्ये बिल्डरकडून २५ लाखांची फसवणूक 

Published On: Dec 08 2017 1:43AM | Last Updated: Dec 07 2017 11:06PM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

फ्लॅट देतो असे सांगून वेळोवेळो सुमारे 25 लाखांहून अधिक रक्‍कम घेऊन अर्धवट कागदपत्रे तयार करून फसवणूक व दमदाटी  केल्याप्रकरणी फलटण येथील सक्षम बिल्डर्सचा भागीदार नितीन महादेव भोसले याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनोज महादेव शिंदे (रा. मलठण) यांनी फलटण शहरालगत  बिरदेवनगर येथे सक्षम बिल्डर्सच्या गृहप्रकल्पामध्ये फ्लॅटची नोंदणी केली होती. सुमारे 12 लाख किमतीच्या फ्लॅटसाठी शिंदे यांनी नितीन भोसले याला 12 लाख  पोहोच केले, तरीही  भोसले याने शिंदेंना फ्लॅटचा ताबा दिला नाहीच, उलट शिंदे यांचा विश्‍वास संपादन करून त्याच फ्लॅटवर 12 लाख कर्ज काढले. शिंदे यांना हे समजताच त्यांनी भोसलेकडे विचारणा केली.

मात्र, त्यांना दमदाटी करण्यात आली. यानंतर शिंदे यांनी मध्यस्थीने व विनवण्या करून बिल्डर भोसले याला पैशांची मागणी केली असता भोसलेने 7 लाखांचा धनादेश दिला. तोही न वटल्याने शिंदे यांची गुरुवारी फलटण शहर पोलिस ठाण्यात नितीन महादेव भोसले याच्याविरोधात दमदाटी आणि फसवणुकीची तक्रार दिली. याबाबत तपास पो.नि. प्रकाश सावंत करत आहेत.