Thu, Sep 20, 2018 14:10होमपेज › Satara › सातारा महालोक अदालतीमध्ये 20,841 प्रकरणांचा निपटारा 

सातारा महालोक अदालतीमध्ये 20,841 प्रकरणांचा निपटारा 

Published On: Dec 16 2017 1:49AM | Last Updated: Dec 15 2017 10:48PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

जिल्हा न्यायालयात आयोजित  केलेल्या राष्ट्रीय महा लोकअदालतीचे उदघाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

महालोक अदालतीच्या आयोजनामुळे लोकांचा पैसे व वेळेची बचत होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल  यांनी सांगितले. महालोक अदालतीमध्ये प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे मिळून एक लाखापेक्षा जास्त प्रकरणे ठेवण्यात  आली होती. त्यापैकी 20 हजार 841 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला.  तसेच निकाली प्रकरणांमध्ये विविध कंपन्या व संस्थांच्या थकीत वसुली प्रकरणांमध्ये तडजोडी करण्यात आल्या. महालोक अदालतीच्या पॅनलवर ज्येष्ठ विधीतज्ञांनी सदस्य म्हणून काम पाहिले.

जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. वैभव काटकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. बी.टी. सानप, सचिव अ‍ॅड. विवेक देशमुख, न्या. श्रीमती वर्षा पारगावकर यांची उपस्थिती होती.