Mon, Sep 24, 2018 07:38होमपेज › Satara › कंटेनरला धडक दिल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

कंटेनरला धडक दिल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

Published On: Aug 17 2018 12:05PM | Last Updated: Aug 17 2018 12:05PMभुईंज : वार्ताहर

पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरला पाठीमागून दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. यात मृत झालेल्यांची नावे निलेश मुरलीधर फरांदे (वय ३५), अजित भालचंद्र फरांदे (वय ३६) दोघेही रा. आनेवाडी, ता. जावली अशी आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री १०.३० वाजता साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला  (एन. एच. ४६ एच. ५४६) दुचाकी  (एम. एच ११ सीएम ०४३५) या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकी वरील निलेश फरांदे आणि अजित भालचंद्र फरांदे हे जागीच ठार झाले. या प्रकरणी भुईंज पोलिसांनी कंटेनर चालकास अटक केली आहे.