Sun, Aug 18, 2019 21:01होमपेज › Satara › आवाज करणार्‍या १६ बुलेटवर कारवाई

आवाज करणार्‍या १६ बुलेटवर कारवाई

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 11:11PMखेड : वार्ताहर

सातारा वाहतूक पोलिसांनी बुधवारी सांयकाळी अचानक मोहीम राबवून बेदरकार ‘आव्वाज करणार्‍या’ बुलेट वाहनांवर कारवाईचा दंडुका उगारला. यामुळे आवाज करणार्‍या बुलेट चालकांची चांगलीच पंचाईत झाली. वाहन चलकांनी मोटार वाहन कायद्याचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले. दरम्यान, पोलिसांच्या या मॉक ड्रिलचा थरार नागरिकांनीही अनुभवला.

बुधवारी सायंकाळी बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात सहा वाजता मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जमला होता. यामुळे परिसरातील व्यवसायिक, नागरिक यांच्यामध्ये काहीशी घाबरगुंडी निर्माण झाली.  पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी यावेळी मॉक ड्रिल राबवून डेमो घेतला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आल्यानंतर पोलिसांनी तो प्रसंग कसा हाताळा यासाठी हे मॉक ड्रिल होते. यावेळी पोलिसांनी उपस्थित नागरिकांनाही याबाबत सूचना दिल्या. ही कारवाई म्हणजे पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्‍वास टज्ञकला. दरम्यान, यावेळी वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहनांवरही कारवाईचा दंडूका उगारण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने बेदरकारपणे जाणार्‍या बुलेट वाहनांना टार्गेट करण्यात आले. बुलेटच्या माध्यमातून गोळी सारखा आवाज करणारी वाहने रडारवर होती. सोमवारी अशा सहा तर बुधवारी दहा अशाप्रकारे एकूण सोळा वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. 

पोलिसांच्या या कारवाईने वाहन चालकांनी धसका घेतला असून सर्व वाहन चालकांनी लायसन, गाडीची कागदपत्रे जवळ बाळगून वाहनांचा कर्कश आवाज होईल असे वाहन चालवू नये, असे आवाहन करण्यात आले.