Tue, Jul 23, 2019 11:46होमपेज › Satara › उंडाळेतील मंदीर १५० वर्षांपुर्वीचे

उंडाळेतील मंदीर १५० वर्षांपुर्वीचे

Published On: Jul 22 2018 11:08PM | Last Updated: Jul 22 2018 9:13PMउंडाळे : वैभव पाटील

उंडाळेतील मातीला समाज प्रबोधनाबरोबरच सांप्रदायाची परंपरा आहे. माजी मंत्री विलासराव पाटील व जयसिंगराव पाटील (उंडाळकर) यांचे आजोबा स्व. आनंदराव लक्ष्मण यादव ˆपाटील यांनी 150 वर्षापूर्वीपासून उंडाळे येथे विठ्ठलˆ रूक्मिणी मंदिराची स्थापना केली. तेव्हा पासून आज अखेर येथे विठ्ठल ˆ रूक्मिणीची नित्यभावे पूजाअर्चा केली जाते. तर आषाढी एकादशीला या मंदिरात दिवसरात्र भजन, किर्तन होतेे. 

‘कृष्णाई’ ही वारकरी सांप्रदायातील महिला होती. तिच्या भक्तीमुळे 150 वर्षापूर्वी आनंदराव पाटील यांनी उंडाळे येथे विठ्ठलˆ रूक्मिणीचे मंदिर बांधले.  मंदिरात चैत्री वारीसाठी पंढरपूरला शिराळा येथून जाणार्‍या गोरक्षणाथाच्या दिंड्या  दोन दिवस मुक्काम करत होत्या. सलग दोन दिवस भजन, किर्तन, ग्रंथ वाचन यासह ज्ञानोबाˆ तुकारामाचा जयघोष सुरू रहात होता. पण काळाच्या ओघामध्ये यात बदल होता गेला. त्यामुळे पूर्वीचे विठ्ठल रूक्मिणी मंदिर एका बाजूला पडू लागले. ही खंत स्व. दादा उंडाळकर यांना झाली व त्यांनी आपल्या वडिलांच्या सांप्रदायाची पताका पुढे चालवण्यासाठी येथील विठ्ठल ˆ रूक्मिणी मंदिर नव्या कराड ˆ चांदोली रोडकडेला स्वत:च्या शेतात बांधले. त्यानंतर या मंदिरात भक्तगणांचा ओढा वाढला. येथे गोरक्षणानाथाच्या दिंड्या दोन दिवस स्थिरावतात. विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना आणि येताना या मंदिरात वारकरी येत. या वारकर्‍यांबरोबर विभागातील भक्तगणही   गर्दी करतात. 

मंदिराची नव्याने सुसज्ज अशी उभारणी स्व. आनंदराव पाटील यांचे नातू दादा उंडाळकर यांचे चिरंजीव जयसिंगराव पाटील व कुटुंबाने केली.  एकादशीला मोठा उत्सव असतो. येथे दिवसभरात भजन, किर्तन, फराळाचे वाटप होते. तर दुसर्‍या दिवशी महाप्रसाद उंडाळकर कुटुुंबियांचेवतीने जयसिंगराव पाटील करतात.