Wed, Sep 19, 2018 09:29होमपेज › Satara › सातारा : बालिकेवर अत्याचार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न 

सातारा : बालिकेवर अत्याचार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न 

Published On: Mar 15 2018 2:13PM | Last Updated: Mar 15 2018 2:13PMकुडाळ (सातारा): प्रतिनिधी

मेढ्यातील 14 वर्षीय बालिकेवर सतत दोन वर्ष अत्याचार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या सागर किसन पार्टे (वय 28 ) रा.आसनी ता. जावली या नराधमाविरोधात मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मेढा परिसरात खळबळ माजली आहे. 

आरोपी सागर पार्टे याने 2015 पासून नग्न अवस्थेतील फोटो दाखवून लैंगिक शोषण केले. तसेच वेळोवेळी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडित मुलीने तक्रार दिली आहे.