Wed, Aug 21, 2019 19:03होमपेज › Satara › जुगार चालकासह १३ जणांना अटक

जुगार चालकासह १३ जणांना अटक

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 10:31PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत नदीकाठावर सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी अड्डा चालकासह अटक केलेल्या 13 जणांना सोमवार दि. 15 रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, पाच दुचाकी, मोबाईल, टेबल तसेच पत्र्याचे शेड असा दोन लाख 46 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी ही कारवाई केली होती.

जमीन मालक पटेल (पुर्ण नाव माहित नाही), जुगार अड्डा चालक श्रीकुमार शिरीष स्वामी (वय 31), संजय रामचंद्र रुद्राक्ष (दोघही रा. कराड), शरणाप्पा देवाप्पा हुडगे उर्फ पुजारी (28, रा. मलकापूर, ता. कराड), फिरोज करीम मुल्ला (35), उमेश दिनकर कळंत्रे (45, दोघेही रा. कार्वे, ता. कराड), गणेश जालिंदर यादव (29, रा. कराड), राकेश गुलाब थोरवडे (30, रा. कराड), संभाजी शिवाजी भोपते (31, रा. कराड), इस्माईल रफिक तांबोळी (21, रा. कराड), हमीद साहेबलाल शेख (32, रा. कराड), जिलानी अल्लाउद्दीन शेख (21, कराड), बसवराज युवराज करीगार (20, कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.  

याबाबत पोलिसांनी सांगितले की, गोटे गावच्या हद्दीत अन्नपुर्णा हॉटेलच्या पुर्वेस वीटभट्टीपासून खाली नदीपात्राशेजारी पटेल यांच्या शेत जमिनीत संजय रुद्राक्ष व शरणाप्पा पुजारी यांनी पत्र्याचे बंदीस्त शेड तयार केले होते. या शेडमध्ये इतर संशयित टेबलभोवती गोलाकार बसून तीन पानी पत्याने पैसे लावून जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून 7900 रोख, 1 लाख 31 हजार रुपयांची पाच वाहने, 69 हजार 500 रुपयांचे मोबाईल व जुगाराचे 38 हजार 500 रुपयांचे साहित्य असा एकूण 2 लाख 46 हजार 900  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.