Sun, Apr 21, 2019 00:11होमपेज › Satara › पुढारी स्पेशल : १०४ वर्षाच्या आज्जीच्या आवाजात जोतिबाचं गाणं (Video)

पुढारी स्पेशल : १०४ वर्षाच्या आज्जीच्या आवाजात जोतिबाचं गाणं (Video)

Published On: Apr 25 2018 1:18PM | Last Updated: Apr 25 2018 1:26PMकराड : सतीश मोरे

नातवंडे, परतवंडे यांनी भरलेल्या घरात स्वत:ला ‘श्रीमंत’ समजणाऱ्या वैजयंता पांडुरंग पिसाळ सावकार यांनी त्यांचा १०४वा वाढदिवस नुकताच साजरा केला. या आजी सध्या त्यांची चौथी पिढी पाहत आहेत. कराडच्या करवडी तालूक्यात राहणाऱ्या या आजींचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. 

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वयाची ६० वर्षे पार केली की प्रत्येकाला आपण म्हातारे झालो. आमचं सगळं संपल आता आम्ही डोळे मिटायला मोकळे असे संवाद कानावर पडतात. मात्र, १०४ वर्षे वयातही ही आजी नातवांमध्ये रमते त्यांच्यासाठी गाणी म्हणते. आजीच्या या वाढदिवसाला स्पेशल बनवण्यासाठी आजीचे आशिर्वाद घेण्यासाठी घरातील सर्व ४८ जण आले होते. 

माझे पती मला जोतिबा डोंगरावर घेऊन गेले होते. जोतिबाच्या यात्रेत यात्रेत पारंपारिक गाणी गायली जातात, अशी आठवण या आजींनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना शेअर केली.  

या आजीला पाहून अनेकांना त्यांची आजी आठवत असेल. चला तर मग ऐकूयात त्यांनी म्हणलेले गाणं...
 

Tags : Satara, Grandmother, Birthday, Karad, 104 Age