Sun, Nov 18, 2018 09:46होमपेज › Satara › जिल्ह्यात १ हजार शाळा संगणकापासून वंचित

जिल्ह्यात १ हजार शाळा संगणकापासून वंचित

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रविण शिंगटे

सातारा जिल्ह्यातील 1 हजार 58 प्राथमिक शाळांमध्ये सध्य स्थितीत संगणक उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दरवर्षी संगणकासाठी करण्यात येणारी तरतूद कुठे गेली? जिल्हा परिषदेच्या विविध शाळांना अनेक मान्यवरांकडून  भेट स्वरूपात देण्यात आलेल्या संगणकाचे काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. दरम्यान, पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापुर्वी किमान प्रत्येक शाळेत एक संगणक उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत.

सर्वत्र माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. तसेच अनेक पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे ओढा वाढलेला दिसत आहे. या शाळांना शह देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये खाजगी शाळांच्या तुलनेत बदल होत चालला आहे. बहुतांश शाळांमध्ये बोलक्या भिंती, संगणक यासह विविध गोष्टीवर भर देण्यात आला आहे. मात्र सध्य स्थितीत जवळपास 1 हजार 58 शाळांमध्ये संगणक उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकाची गोडी कशी लागणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या शाळांना  येत्या शैक्षणिक वर्षापासून किमान एक संगणक उपलब्ध करून द्यावा. तसेच मोठ्या ग्रामपंचायतीमध्येे निधीची उपलब्धता आहे अशा ठिकाणी जि.प. प्राथमिक शाळेला प्रोजेक्टर उपलब्ध करून द्यावा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत.

14 व्या वित्त आयोग व स्वनिधीमधून  जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये ई लर्निंग उपक्रम राबविणे (संगणक, प्रिंटर, एलसीडी प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड, डिजिटल क्लासरूम इ.) जि.प. शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधणे व त्यांची देखभाल दुरूस्ती करणे, सर्व अंगणवाड्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, जि.प. प्राथमिक शाळा व अंगणवाडी इमारत दुरूस्ती करणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोली बांधणे, अंगणवाडी बांधकाम करणे आदी कामे प्राधान्याने घेण्याबाबत 1 हजार 496 ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत.

गटविकास अधिकार्‍यांनी ग्राम-पंचायतीच्या आराखड्यामध्ये तांत्रिक छाननी करताना ग्रामपंचायत विभागाने सुचवलेली कामे आराखड्यात घेतली आहेत की नाहीत याची  खात्री करावी. जुलैपर्यंत सर्व प्राथमिक शाळांमध्ये ई लर्निंग सुविधा पुरविण्यात आल्याची खात्री करून त्याचा अहवाल जि.प. प्रशासनाकडे सादर करावा.   - डॉ. कैलास शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी 

 

Tags : satara, satara news, satara zp sachool, computer, student, 


  •