होमपेज › Satara › लोणंदजवळ टेम्पोला मालट्रकची धडक; १ ठार

लोणंदजवळ टेम्पोला मालट्रकची धडक; १ ठार

Published On: Jun 18 2018 1:12AM | Last Updated: Jun 17 2018 11:21PM



लोणंद : प्रतिनिधी

लोणंद-सातारा रस्त्यावर तांबवे (ता. फलटण) गावच्या हद्दीत भैरवनाथ मंगल कार्यालयाजवळ रविवारी पहाटे तीनच्या सुमारास मालट्रकने टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर दोघे जखमी झाले. उमेश बाळासो घोडके (वय 38, रा. बुधगाव, मिरज, जि. सांगली) असे ठार झालेल्याचे नाव आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारकडून लोणंदकडे येणारा मालट्रक (क्रमांक एमपी 33 एच 4449) याचा चालक मद्यप्राशन करून भरधाव वेगाने जात होता. हा मालट्रक तांबवे गावच्या हद्दीतील भैरवनाथ मंगल कार्यालयाजवळ आला असता लोणंदकडून सातार्‍याकडे निघालेला टेम्पो (क्रमांक एमएच 09 ईएम 211) चुकीच्या बाजूने जात असताना हा अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक  उमेश घोडके हा गंभीर जखमी झाला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात बलराम कुशवाह व क्‍लिनर जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद  लोणंद पोलिस ठाण्यात झाली असून बलराम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश पवार करत आहेत.