Sat, Jun 06, 2020 08:13होमपेज › Satara › फलटण : किरकोळ कारणावरून दोन गटात राडा

फलटण : किरकोळ कारणावरून दोन गटात राडा

Published On: Jan 21 2018 3:52PM | Last Updated: Jan 21 2018 3:56PMफलटण : प्रतिनिधी 

राजुरी ता.फलटण येथे वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरून दोन युवकांच्या गटात जोरदार मारामारी झाली. यामध्ये एकाच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला आहे. तर  चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, राजुरी  आणि बागेवाडी ता.फलटण येथील एकाचा वाढदिवस शनिवारी दि.२० रोजी होता. यावेळी रात्री बाचाबाची झाली. या भांडणाचे पडसाद आज पुन्हा उमटले. आज दि.२१ रोजी सकाळी दोन्ही गटात जोरदार मारामारी झाली. यामध्ये डोक्याला मार लागून एकजण गंभीर जखमी झाला. तर चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे.