Tue, Jun 02, 2020 01:59
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › प्रविण गायकवाड यांच्या उमेदवारीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील : पृथ्वीराज चव्हाण

प्रविण गायकवाड यांच्या उमेदवारीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील : पृथ्वीराज चव्हाण

Published On: Feb 21 2019 4:42PM | Last Updated: Feb 21 2019 4:38PM
कराड : प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाकडे पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मागितली तर पक्ष निश्चित विचार करेल. पुणे व सांगली बाबत उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक असून माझ्यासोबत हर्षवर्धन पाटील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

प्रवीण गायकवाड यांचे नाव पुणे लोकसभा मतदारसंघातून पुढे येत आहे. पुणे मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसकडेआहे. प्रवीण गायकवाड हे खासदार शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. खासदार शरद पवार यांनीच प्रवीण गायकवाड यांचे नाव सुचवले आहे, अशा बातम्या आल्या असल्याबाबत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता याबाबत आम्ही आमच्या पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत. यापूर्वीही पुणे मतदारसंघाबाबत चर्चा झालेल्या आहेत. प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी हवी असेल तर तेही आमच्या पक्षाकडे उमेदवारी मागू शकतात. पक्ष त्यांचाही विचार करेल मात्र याबाबतचे निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात, असेही चव्हाण यांनी सांगितले.