Sun, Mar 24, 2019 17:31होमपेज › Sangli › नव्वद अभियंते सामूहिक रजेवर 

नव्वद अभियंते सामूहिक रजेवर 

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 10:38PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेकडील बांधकाम, छोटे पाटबंधारे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील 90 अभियंते सोमवारपासून दोन दिवस सामूहिक रजेवर आहेत. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोेलन केले.  जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे  अध्यक्ष दुष्यंत कांबळे, कार्याध्यक्ष प्रदीपकुमार सुर्वे, सचिव प्रमोद मसुटगे, जिल्हा परिषद अभियंता पतसंस्थेचे अध्यक्ष एन. पी. कोरे, उपाध्यक्ष महादेव सूर्यवंशी, प्रवीण तेली, ए. जी. चव्हाण, एच. एस. कांबळे, जे. वाय. धर्माधिकारी, पंडित लोहार, अरविंद पाटील उपस्थित होते. धरणे आंदोलनात 90 अभियंते सहभागी होते. 
जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र या नोंदणीकृत संघटनेस शासनमान्यता द्यावी, जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना प्रवास भत्त्यापोटी दरमहा किमान 10 हजार रुपये मासिक वेतनासोबत द्यावेत, संघटनेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या 

निर्देशानुसार नवीन उपविभाग तात्काळ निर्माण करावेत, अभियंता संवर्गास शाखा अभियंता पदाचा दर्जा देण्याचा दिनांक व त्याबाबत करावयाची वेतन निश्‍चिती जलसंपदा विभागाकडील दि. 6 डिसेंबर 2014 च्या निर्णयाप्रमाणे करण्याबाबत ग्रामविकास विभागाने आदेश जारी करावेत, कनिष्ठ अभियंता संवर्गातील व स्थापत्य अभियांत्रिकी संंवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावीत, यासाठी हे आंदोलन सुरू आहे.