Mon, Nov 19, 2018 08:23होमपेज › Sangli › सांगली : खुनी हल्‍ल्यातील कुपवाडच्या युवकाचा मृत्यू

सांगली : खुनी हल्‍ल्यातील कुपवाडच्या युवकाचा मृत्यू

Published On: Jan 11 2018 3:10PM | Last Updated: Jan 11 2018 3:10PM

बुकमार्क करा
सांगली : पुढारी ऑनलाईन

कुपवाड येथे मंगळवारी झालेल्या हल्‍ल्यातील तरुणाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. तुकाराम ईश्वरा गुजले (वय २६, रा. हनुमान नगर, कुपवाड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी चार आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्‍हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 

मंगळवार दि. ९ रोजी तुकाराम याच्यावर कुपवाड येथील दारू दुकानाच्या आवारात चौघांनी खुनी हल्‍ला केला होता. त्याच्यावर मिरजेतील मिशन हॉस्‍पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी पहाटे तुकारामचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी चौघा आरोपींवर खुनाचा गुन्‍हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आले असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.