Wed, Sep 26, 2018 18:11होमपेज › Sangli › बुधगावमध्ये दोघांत फांदीवरून हाणामारी

बुधगावमध्ये दोघांत फांदीवरून हाणामारी

Published On: Apr 09 2018 1:40AM | Last Updated: Apr 09 2018 1:35AMसांगली : प्रतिनिधी

बुधगाव (ता. मिरज) येथील वनवासवाडी येथे झाडाची फांदी घरावर पडल्याच्या कारणावरून दोघांत हाणामारी झाली. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी दोघांनीही सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत. 

अशोक धनाजी पाटील (वय 36), देवानंद निवृत्ती साळुंखे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. साळुंखे यांचा वनवासवाडीत रिकामा प्लॉट आहे. तेथे त्यांनी विविध प्रकारची झाडे लावली आहेत. त्यांच्या प्लॉटच्या शेजारीच अशोक पाटील रहातात. प्लॉटमधील झाडे खूप वाढल्याने त्याचा त्रास होत आहे. ती कापून घ्या, असे पाटील यांनी त्यांना सांगितले होते. मात्र साळुंखे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. 

शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळात साळुंखे यांच्या प्लॉटमधील एका झाडाची फांदी तुटून पाटील यांच्या घरावर पडली. त्यानंतर पाटील यांनी साळुंखे यांच्या घरी जाऊन त्याचा जाब विचारला. त्यावरून दोघात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले.