Fri, Nov 16, 2018 19:18होमपेज › Sangli › सांगली : येलूर येथील तिघांच्या मृत्यूप्रकरणी कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

सांगली : येलूर येथील तिघांच्या मृत्यूप्रकरणी कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली: प्रतिनिधी

वाळवा तालुक्यातील येलूर येथे विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून महावितरणच्या येलूर शाखेचे कनिष्ठ अभियंता व वरिष्ठ तंत्रज्ञ यांना शनिवारी (दि. ३१) रोजी निलंबित करण्यात आले.

दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० हजार रुपयांची तातडीने मदत देण्यात आली आहे. तसेच महावितरणकडून या घटनेची पुढील चौकशी सुरु करण्यात आली असून दोषी आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई अथवा निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

येलूर येथील उसाच्या शेतात वीजतारेचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने प्रभाकर लक्ष्मण महाडिक, छाया लक्ष्मण महाडिक व प्रकाश भिमण्णा मगदूम यांचा ३१ मार्च रोजी पहाटे मृत्यू झाला. याप्रकरणी चोवीस तासांच्या आत ताबडतोब प्राथमिक चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी प्रथमदर्शनी दोषी आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कर्मचारी सेवाविनियम अन्वये कठोर कारवाई अथवा निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

त्यानुसार प्राथमिक चौकशीत प्रथमदर्शनी दोषी आढळून आलेले येलूर शाखेचे कनिष्ठ अभियंता नितीन मुटेकर व वरिष्ठ तंत्रज्ञ रघुनाथ बावचकर यांना दि. ३१ मार्चला निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे.


  •