Thu, Jan 17, 2019 10:14होमपेज › Sangli › कमी दर देणार्‍या दूध संघांवर कारवाई करा

कमी दर देणार्‍या दूध संघांवर कारवाई करा

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 15 2018 8:41PMयेळवी : वार्ताहर

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुधाच्या दरापेक्षा कमी दर देऊन शेतकर्‍यांची आर्थिक लुबाडणूक करणार्‍या दूध संघांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रासपने केली आहे. रासपचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील यांनी दुग्धविकास मंत्री ना. महादेव जानकर यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, जत तालुक्यात सहकारी दूध संघ नाही. यामुळे शेतकर्‍यांना खासगी दूध संघांना दूध घालावे लागते. 3. 5 फॅट व 8.5 घनता (एस.एन.एफ.) असेल तर प्रतिलिटर 27  रुपये दर देण्याचे शासनाचे बंधन आहे. मात्र काही बाहेरील  दूध संघ सुरुवातीला 25 रु. दर देत होते. मात्र आता लिटरला 20 रु. दर देत आहेत. यातून शेतकर्‍यांचे  आर्थिक शोेषण होत आहे.

सांगली जिल्ह्यात हेच दूध संघ लिटरला  25 रु. दर देतात, मात्र  दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील शेतकर्‍यांना मात्र 20 रु. प्रमाणे दर देऊन दुजाभाव करीत आहेत. पाटील म्हणाले, तालुक्यामध्ये साधारणपणे 700 संकलन केंद्रामधून प्रतिदिनी सुमारे दीड लाख लिटर दूध संकलन होते. मात्र दर कमी मिळत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. शासन निर्णयापेक्षा कमी दर देणार्‍या दूध संघांवर कायदेशीर कारवाई करावी. दुधाला शासनाचा दर मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रासपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र साठे, जत शहराध्यक्ष भूषण काळगी, अखिल नगारजी उपस्थित होते.