Tue, Apr 23, 2019 21:53होमपेज › Sangli › तीन वर्षाच्या चिमुकलीसह विवाहितेची आत्महत्या

तीन वर्षाच्या चिमुकलीसह विवाहितेची आत्महत्या

Published On: May 13 2018 11:22AM | Last Updated: May 13 2018 12:02PMसांगली : प्रतिनिधी
शहरातील घनश्याम नगर येथील विहिरीत तीन वर्षांच्या मुलीसह उडी मारून एका विवाहितेने आत्महत्या केली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 

पूजा राजेश चौगुले (वय 21) सृष्टी राजेश चौगुले (वय 3) रा. विकास नगर, सांगली. अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळी संजयनगर पोलिस दाखल झाले असून विहिरीतून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.