Mon, Jul 13, 2020 01:58होमपेज › Sangli › तासगाव : तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून महिला मजूराचा मृत्यू

तासगाव : तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून महिला मजूराचा मृत्यू

Last Updated: Jun 02 2020 10:44AM
तासगाव : पुढारी वृत्तसेवा

महावितरणच्या तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागल्याने तासगाव तालुक्यातील नागाव (क) येथील रेखा माणिक मदने (वय ३६) या महिला मजूराचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना मंगळवारी ( दि. २ ) सकाळी घटना घडली. 

दरम्यान दुर्घटनेनंतर पोलिस, महावितरणचे कर्मचारी तीन तासाने पोहोचले. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या महिलेचा जीव गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

सोमवारी सुटलेल्या वादळी वाऱ्यात नागाव (क) येथील माळी मळ्यातील उदय जयसिंग पाटील यांच्या द्राक्षबागेतील विजेची तार तुटून पडली होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना याची कल्पना देऊनही कालपासून या तारेतील विद्युत प्रवाह बंद केला नव्हता.

आज सकाळी उदय पाटील यांच्या बागेत नागाव (क) येथील रेखा मदने यांच्यासह अन्य कामगार मजूरीसाठी आले होते. सकाळी ७ वाजता काम सुरू होताच रेखा यांना तुटलेल्या तारेतून विजेचा धक्का लागला. विजेच्या तीव्र त्यांचा मृत्यू झाला.