Sat, Apr 20, 2019 17:52होमपेज › Sangli › येडेमच्छिंद्र येथील महिला अपघातात ठार

येडेमच्छिंद्र येथील महिला अपघातात ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इस्लामपूर : शहर वार्ताहर

इस्लामपूर-बहे रस्त्यावर राजेबागेश्‍वरनजीक मोटारसायकलला पाठीमागून डंपरने धडक दिल्याने येडेमच्छिंद्र येथील महिला जागीच ठार झाली.  मोटारसायकलवरील तिघे जण जखमी झाले. 

प्रमिला प्रकाश सोनवले (वय 29) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. दादासाहेब गणपती सोनवले (वय 60), निरंजन प्रकाश सोनवले (वय 4, सर्व रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा), सचिन दादासो सोनवले (वय 29, मूळ गाव येडेमच्छिंद्र, सध्या रा. उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर) अशी जखमींची नावे आहेत.

सदरचा अपघात मंगळवारी सकाळी झाला. अपघातानंतर डंम्परचालक फरार  झाला आहे. या अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : सचिन, प्रमिला, दादासो, निरंजन हे  मोटारसायकल (एम.एच.10-एजे-9528) वरून इस्लामपूरकडे येत होते. पाठीमागून डंम्पर ( एम.एच. 13/एएक्स-2150) ने जोरदार धडक दिली.  मोटारसायकलवरील सर्वजण रस्त्यावर पडले. प्रमिला यांच्या डोक्यावरून डम्परचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दादासाहेब गंभीर जखमी झाले.जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Tags : woman killed, accident, Yedemachhindra, sangli


  •