Wed, Sep 19, 2018 20:46होमपेज › Sangli › करजगीत महिलेचा तलावात बूडन मृत्यू 

करजगीत महिलेचा तलावात बूडन मृत्यू 

Published On: Mar 05 2018 1:44AM | Last Updated: Mar 04 2018 11:41PMउटगी  ः वार्ताहर

करजगी (ता. जत) येथील धानेश्वरी सुरेश अक्कलकोट (वय 20) या महिलेचा तलावातील पाण्यात बूडन मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद पती सुरेश निलाप्पा अक्कलकोट यांनी उमदी पोलिसात दिली आहे .
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः  मयत धानेश्वरी ही दि. 2 मार्चरोजी घरातील कोणाला  काहीच न सांगता निघून गेली होती.

मात्र काल रविवारी तिचा मृतदेह शेजारील तलावात दिसून आला. या घटनेबाबत नागरिकांतून अनेक तर्कवितर्क सुरू होते. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिस घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.