मिरज : शहर प्रतिनिधी
शहरातील टाकळी रस्त्यावर असणार्या एका घरामध्ये महिलेला दारू पाजून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पीडित महिलेने तिचा पती, नणंद व अन्य महिलांविरुद्ध रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित महिला ही टाकळी रस्त्यावरील एका वस्तीमध्ये राहते. तिला संशयावरून आज दुपारी तिचा पती, नणंद व काही
महिलांनी मारहाण केली. तिला मारहाण करण्यापूर्वी तिला दारूही पाजण्यात आली. त्यामुळे ती महिला काही वेळ बेशुद्धही पडली होती. तिला सायंकाळी शुद्ध आल्यानंतर काही महिलांच्या मदतीने ती शहर पोलिस ठाण्यात पोहोचली. रात्री तिला वैद्यकीय तपासणीसाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले.