Mon, Jun 24, 2019 17:28होमपेज › Sangli › सांगलीत युवकावर खुनीहल्ला

सांगलीत युवकावर खुनीहल्ला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरातील दसरा चौकात जुगारातील पैशाच्या वादातून  अक्षय ऊर्फ आकाश लक्ष्मण वडर या युवकावर चाकूने खुनीहल्ला करण्यात आला. यावेळी दोन्ही गटांत झालेल्या मारामारीत तिघे जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती विश्रामबागचे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली. अक्षय अनिल नाईक (वय 19, रा. वडर कॉलनी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अक्षय नाईक याने दिलेल्या फिर्यादीनुसार नागेश यमनाप्पा कलकुटगी (वय 27, रा. वडर कॉलनी), महेश सावंत यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये अक्षय ऊर्फ आकाश लक्ष्मण वडर, अक्षय अनिल नाईक जखमी झाले आहेत. अक्षय वडर, नागेश कलकुटगी यांच्यावर सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी सर्वजण सर्वोदय व्यायाम मंडळाच्या मैदानावर पैसे लावून पत्यांचा जुगार खेळत बसले होते. त्यावेळी नागेश कलकुटगी व अक्षय वडर यांची पैशावरून वादावादी झाली. नंतर काळी वेळाने त्यांच्यातील वाद मिटविण्यात आला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास नागेश आणि महेश सावंत दसरा चौकातील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. तेथून ते दसरा चौकात एका पानपट्टीवर पान खाण्यासाठी गेले. 

त्यावेळी अक्षय वडर व विनोद जयसिंग कुर्‍हाडे तेथे मोटारसायकलवरून आले.  अक्षय वडर व नागेशमध्ये पुन्हा वादावादी झाली. त्यावेळी नागेशने खिशातील चाकू काढून अक्षयच्या पोटात दोनदा खुपसला. त्यावेळी अक्षय नाईक भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्याच्यावरही चाकूने वार करण्यात आला. त्यावेळी त्याने वार चुकविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्या हातावर वार झाला. याप्रकऱणी नागेश कलकुटगी यानेही अक्षय वडर, अक्षय नाईक, विनोद कुर्‍हाडे यांच्याविरोधात मारहाणीची फिर्याद दिली आहे. दसरा चौकात पानपट्टीजवळ थांबल्यानंतर रागाने का पाहिलास असे म्हणत विनोदने काठीने मारहाण केली तर अक्षय नाईकने चाकूने डोक्यावर तर अक्षय वडरने पायावर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. यातील अक्षय नाईकला अटक करण्यात आली असून नागेश कलकुटगी, अक्षय वडर यांच्यावर सिव्हीलमध्ये उपचार सुरू आहेत. महेश सावंत, विनोद कुर्‍हाडे गायब झाल्याचे निरीक्षक पोमण यांनी सांगितले. 

Tags : Sangli, Sangli News,  knife, attempt, murder,  young man


  •