Thu, Apr 25, 2019 05:45होमपेज › Sangli › ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणार्‍या  सरकारकडून अपेक्षाभंग : जयंत पाटील 

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणार्‍या  सरकारकडून अपेक्षाभंग : जयंत पाटील 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

आटपाडी : प्रतिनिधी 

मोठ्या अपेक्षेने जनतेने भाजपला सत्ता दिली. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणार्‍या या सरकारने मात्र जनतेचा अपेक्षाभंग केला.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे  प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले. बुधवारी आटपाडीत होणारी हल्लाबोल सभा मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करा, असे आवाहनही त्यांनी केले.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेच्या तयारीनिमित्त सभास्थळाची पाहणी व नंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीत  पाटील बोलत होते. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, रावसाहेब पाटील, सादिक खाटीक, सूरज पाटील, अमित ऐवळे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, शेतमालाला भाव नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर आंदोलने करावी लागत आहेत. या सरकारला लोक कंटाळले आहेत.शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादीची ताकद दाखवून देत हल्लाबोल सभा यशस्वी करण्याचे त्यांनी आवाहन केलेे. हणमंतराव देशमुख म्हणाले, सरकारने लोकांना फसवले आहे.लोकांना केलेली चूक समजली आहे.  यावेळी भाजपने डावलल्याने रावसाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे सांगत पक्षाची ताकद वाढविण्याची ग्वाही दिली. बैठकीपूर्वी जयंत पाटील यांनी बचतधाम परिसरात होणार्‍या सभास्थळाची पाहणी केली.

Tags : Sangli, Sangli News, large, expectation,  people,  peoples, give, power, BJP


  •