Tue, Jan 22, 2019 09:48होमपेज › Sangli › दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर खुनी हल्ला

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर खुनी हल्ला

Published On: Mar 23 2018 2:00AM | Last Updated: Mar 23 2018 12:12AMउटगी : वार्ताहर 

अंकलगी (ता जत) येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीवर  कोयत्याने  खुनी हल्ला केला. कोयत्याने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. शेजार्‍यांनी त्याला बाजूला केल्याने महिलेचा जीव वाचला. ही घटना बुधवारी रात्री घडली.

उमदी पोलिसांकडून मिळालेली  माहिती अशी की, अंकलगी   येथील अजमद फरदिन मुलाणी दारू पिण्यासाठी   पत्नी शाहीन हिच्याकडे  पैशाची मागणी करीत होता. वारंवार मागणी करूनही  तिने  पैसे दिले नाहीत. याचा  राग मनात धरून बुधवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान त्याने दारुच्या नशेत तिच्यावर कोयत्याने  हल्ला केला.  या हल्ल्यात तिच्या कानावर, दोन्ही हातांवर, मानेवर  जखमा झाल्या आहेत.  ती गंभीर जखमी झाली आहे. उपचारासाठी मिरज येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले आहे.

हल्ला करून मुलाणी फरार झाला आहे . याबाबत   शाहीन हिच्या आईने  उमदी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पती अजमद   मुलाणी याच्या विरोधात हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल   गुन्हा दाखल केला आहे.  अधिक तपास  सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे करीत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ  पोलिस अधिकार्‍यांनी भेट दिली .

Tags : Sangli, Sangli News, wife, did not give money, drink liquor, husband, attacks on wife