Wed, Nov 21, 2018 17:55होमपेज › Sangli › चांदोली परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला 

चांदोली परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला 

Published On: Mar 06 2018 4:02PM | Last Updated: Mar 06 2018 4:02PMवारणावती : प्रतिनिधी

चांदोली धरण परिसर मंगळवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्याने हादरला. पहाटे 1 वाजुन 43 मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता वारणावती येथील भूकंप मापन केंद्रावर 3.1 रिश्टर इतकी नोंदली गेली.भूकंपाचा केंद्रबिंदु वारणा धरणा पासून 20 किलोमीटर अंतरावर होता. शिराळा तालुक्याचे पश्चिम भागातील चांदोली धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत.

27 आक्टोबरला 4 रिश्टर स्केलचा मध्यम स्वरूपाचा धक्का  परिसराला बसला होता तर, नोव्हेंबर महिन्यात 2.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का अति सौम्य नोंदला गेला होता.  हा धक्का सौम्य असला तरी तो जाणवला होता. तसेच 16 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी 2.9 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसला होता वरचेवर भूकंपाची ही मालिका सुरू असतानाच आज पुन्हा पहाटे 1वाजुन 43 मिनिटांनी 3.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.या भुकंपाने कुठेही जीवित व वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही मात्र वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे .