Tue, Apr 23, 2019 13:48होमपेज › Sangli › सामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचेना : इरोम शर्मिला  

सामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचेना : इरोम शर्मिला  

Published On: May 10 2018 12:55PM | Last Updated: May 10 2018 12:54PMइस्लामपूर: वार्ताहर

देशात लोकशाही आहे मात्र तरीही सामान्य जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे लोकांना न्यायासाठी आंदोलनाचे शस्त्र उपसावे लागते असे प्रतिपादन मणिपूर येथील मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्या इरोम चानू शर्मिला यांनी येथे बोलताना केले.

त्या म्हणाल्या, इशान्येकडील राज्यातील जनतेकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तेथील जनतेत असुरक्षितेची भावना आहे. माझ्या भागातील जनतेसाठी मी न्याय मिळावा म्हणून उपोषणाचा मार्ग पत्करला. खरे तर मला लेखणीतून परिवर्तन घडवायचे होते मात्र माझे शिक्षण कमी असल्यामुळे मी उपोषणाचा मार्ग पत्करला. देशातील तरुण हेच देशाचे भविष्य आहे. त्यांनी देशासाठी काही तरी केले पाहिजे. 

यापुढे मी लेखणीच्या माध्यमातून  माझा लढा  सुरू ठेवण्याचा निश्चय केला आहे. राजकारणात पैसा व बळच लागते हे सुत्र खोटे ठरवण्यासाठी मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता मात्र जनतेने मला नाकारले. त्यामुळे मी माझे राज्य  सोडून केरळमध्ये स्थायिक झाले असे त्या म्हणाल्या.