Fri, Feb 22, 2019 20:38होमपेज › Sangli › नागेवाडीच्या कुस्ती मैदानात सूरज निकमची बाजी

नागेवाडीच्या कुस्ती मैदानात सूरज निकमची बाजी

Published On: Dec 30 2017 12:44AM | Last Updated: Dec 29 2017 9:04PM

बुकमार्क करा
विटा  : प्रतिनिधी  

नागेवाडी (ता. खानापूर) येथे (केै.) नानासाहेब निकम यांच्या स्मरणार्थ आयोजित कुस्ती मैदानात युवा महाराष्ट्र केसरी आणि नागेवाडीचा सुपुत्र सूरज निकम याने हरियाणा केसरी रोहित खत्री याला एकचाक डावावर चितपट केले. या मेैदानातील प्रमुख कुस्ती अभिनेते हार्दिक जोशी यांच्याहस्ते लावण्यात आली. त्यांची उपस्थिती या मैदानातील विशेष आकर्षण ठरले. 

या कुस्ती मेैदानात 50 छोट्या मोठ्या कुस्त्या झाल्या. यांतील रोमहर्षक ठरलेली कर्नाटक केसरी कार्तिक काटे विरूध्द महाराष्ट्र चॅम्पियन प्रसाद सस्ते यांच्यातील चटकदार कुस्तीत सस्ते याने डंकी डावावर बाजी मारली. सुरूवातीला शिवसेना खानापूर तालुका प्रमुख सतीश निकम यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, ईश्‍वरशेठ जाधव, मारूती जाधव, दर्शनकुमार निकम, उत्तम पाटणकर, सांगलीचे नगरसेवक शेखर माने, विटा पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब नलवडे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष हेमंत बाबर उपस्थित होते.  निवेदक शंकर पुजारी होते.