Sun, Nov 18, 2018 17:41होमपेज › Sangli › ब्लॅकमेल करणे माजी उपनगराध्यक्षाचे काम :सुभाष भिंगारदेवे  (Video)

ब्लॅकमेल करणे माजी उपनगराध्यक्षाचे काम :सुभाष भिंगारदेवे  (Video)

Published On: Feb 08 2018 7:20PM | Last Updated: Feb 08 2018 7:20PMविटा : प्रवीण धुमाळ

प्रत्येकवेळी आंदोलनाची भाषा करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा धंदा माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांचा आहे. त्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. गेल्या दीड वर्षात प्रभागातील विकासकामे सोडून केवळ एका व्यावसायिकाच्या फाईलीच्या मंजूरीसाठी नगरसेवक अमर शितोळे यांनी नगरपालिका प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा बोलविता धनी वेगळाच असल्याचा, घणाघाती आरोप सत्ताधारी गटाचे नगरसेवक सुभाष भिंगारदेवे यांनी पत्रकार परिषदेत केला.

विटा नगरपालिकेच्या कामकाजात स्वीकृत नगरसेवक वैभव पाटील यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक अमर शितोळे यांनी केला होता. त्याला प्रत्‍युत्‍तर  म्हणून नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्षा प्रतिभा चोथे, नगरसेवक विजय जाधव, फिरोज तांबोळी, संजय तारळेकर, महेश कदम, सचिन शितोळे, अविनाश चोथे, प्रशांत कांबळे, किशोर डोंबे, ज्ञानेश्वर शिंदे, धर्मेश पाटील उपस्थित होते.