Wed, Sep 26, 2018 14:08होमपेज › Sangli › पलूस-कडेगाव विधानसभेसाठी काँग्रेसला राष्ट्रवादीचा पाठिंबा

पलूस-कडेगाव विधानसभेसाठी काँग्रेसला राष्ट्रवादीचा पाठिंबा

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 03 2018 11:45PMकराड  : प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे निधन झाल्यामुळे विधानसभेच्या पलूस-कडेगावच्या जागेवर डॉ. विश्‍वजित कदम लढतील, असे दिसते. काँग्रेस पक्षाला या जागेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा देण्याची घोषणा आज मी या ठिकाणी करीत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपला उमेदवार उभा करणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आ. जयंत पाटील यांनी कराडमध्ये  सांगितले.

स्व. पी. डी. पाटील यांच्या मंगळवार पेठेतील निवासस्थानी आदरांजली अर्पण केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कराडच्या पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ. बाळासाहेब पाटील, दिलीपतात्या पाटील, सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील माने, पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मोहन प्रकाश व राष्ट्रवादी पक्षाचे प्रफुल्ल पटेल यांनी चर्चा केली व आमच्या पक्षाचे व काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आलेले आहेत. लोकसभेच्या दोन जागा गोंदिया राष्ट्रवादी पार्टी व पालघर काँग्रेस पक्ष लढवेल.