Wed, Mar 20, 2019 02:49होमपेज › Sangli › विश्वजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

विश्वजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

Published On: May 07 2018 11:46AM | Last Updated: May 07 2018 11:46AMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी पलूस-कडेगाव मतदारसंघ विधानसभा  पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार मोहनराव कदम, मा.आमदार सदाशिवराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार सतेज पाटील, भारती विद्यापीठाचे प्र कुलपती डॉ शिवाजीराव कदम, सौ.स्वप्नाली कदम, डॉ .अस्मिता जगताप, उद्योगपती अविनाश भोसले, महेंद्र अप्पा लाड, शांताराम कदम आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे लाडके नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या आकस्मिक निधनानंतर पलूस -कडेगाव मतदार संघात पोट निवडणूक होत असून काँग्रेस पक्षाकडून डॉ.विश्वजित कदम यांनी आज अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीने यापूर्वीच आपण याठिकाणी उमेदवा देणार नसून विश्वजित कदम यांना पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Tags : vishwajeet kadam, Filing of nominations, palus kadegaon, by election