Mon, Apr 22, 2019 16:07होमपेज › Sangli › सांगली : सावर्डेतील दारुबंदीसाठी सरपंचांचे ‘खळ्ळ खट्याक’

सांगली : सावर्डेतील दारुबंदीसाठी सरपंचांचे ‘खळ्ळ खट्याक’

Published On: Aug 08 2018 3:18PM | Last Updated: Aug 08 2018 3:20PMतासगाव : प्रतिनिधी

गावातील तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत सापडू नये, त्यांचे भविष्य बिघडू नये यासाठी तासगाव तालुक्यातील सावर्डेच्या सरपंचांनी ‘खळ्ळ खट्याक’ स्टाईलने दारु अड्ड्यांवर कारवाई केली आहे.

गावात शांतता रहावी आणि तरुणांनी वाममार्गाला जाऊ नये म्हणून सरपंचांनीच पुढाकार घेत गावातील अवैद्य दारु विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये देशी दारुच्या १४४ बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९६ बाटल्यांची विल्हेवाट लावण्यात आली तर उरलेल्या बाटल्या पोलिसांकडे सोपवण्यात आल्या. तसेच याप्रकरणी दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.