Thu, Apr 25, 2019 16:01होमपेज › Sangli › कृषी विभागातर्फे व्हिलेज- नॉलेज- कॉलेज उपक्रम 

कृषी विभागातर्फे व्हिलेज- नॉलेज- कॉलेज उपक्रम 

Published On: Jun 15 2018 7:04PM | Last Updated: Jun 15 2018 7:03PMसांगली  : प्रतिनिधी

कृषी विद्यापीठातील विद्यार्थी आणि कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन संवाद साधला जाणारा व्हिलेज- नॉलेज - कॉलेज हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.  अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.  दरम्यान साखरे प्रमाणे दुध व्यवसाय सावरण्यासाठी केंद्राकडे पॅकेज मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, कृषी विभागातील अधिकार्‍यांनी, कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाण्याचे आदेश दिले आहेत. त्या प्रमाणे कृषी विद्यापीठातील विद्यार्थीही शेतात जावे. बियाणे, पिके, खताची मात्रा आदी बाबात शेतकर्‍यांशी संवाद साधला जावा. तरुण अधुनिक शेतीकडे वळावा हा या उपक्रमामागे उद्देश आहे.   ज्या दुकानात परवाने नसलेली किटनाशके वापरली जात असतील तर त्याचे परवाने रद्द केले जातील. सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी महापालिका, बाजार समितीत शेतकर्‍यांना गाळे उपलब्ध करु दिले जातील. तूर उत्पादक शेतकर्‍यांना प्रती क्विटलला एक हजार रुपये तर प्रती हेक्टरी दहा हजार अनुदान देण्यात येईल. 

सध्या दुधाचे उत्पादन अतिरिक्त आहे. त्या शिवाय जागतीक बाजारात दुध पावडरचे दर पडले आहेत. त्यामुळे शंभरटक्के दुध पावडर निर्यात थांबली आहे. दुध शेतकर्‍यांना सावरण्याासाठी साखर कारखान्यां प्रमाणे  पॅकेज मिळावे, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मागणी केली आहे. त्यावर त्यांनी याबाबत सकारात्मक दाखवली आहे.