Fri, Jan 18, 2019 21:44होमपेज › Sangli › लोकअदालतीत 22 लाखांचा धनादेश

लोकअदालतीत 22 लाखांचा धनादेश

Published On: Feb 12 2018 2:05AM | Last Updated: Feb 11 2018 11:30PMसांगली : वार्ताहर

प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिष्ट यांनी यशस्वी मध्यस्थी करून पीडित कुटुंबाला न्यायालयात प्रथमच विमा कंपनीकडून 22 लाख रुपये मिळून दिले. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. पी. देसाई उपस्थित होते.

ऑक्टोबर 2015 मध्ये सुरेश चव्हाण यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यांना चार मुले आहेत. अपघाताची भरपाई मिळावी, यासाठी सुरेश चव्हाण यांच्या पत्नी मनिषा चव्हाण, त्यांची चार मुले, सुरेशचे आई व वडील अशा सात जणांच्यावतीने अ‍ॅड. प्रशांत जाधव यांनी मोटार अपघात भरपाईसाठी न्यायालयामध्ये दावा केला होता.

प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश बिष्ट  यांनी पीडित चव्हाण कुटुंबिय, अ‍ॅड. जाधव, दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक विनायक दीक्षित व सहाय्यक प्रबंधक अभिजित गोरे यांच्याशी अनेक वेळा चर्चा केली. 

आज लोकअदालतमध्ये न्यायाधीश बिष्ट यांनी यशस्वी अंतिम चर्चा केली व दावा निकाली निघाला. न्यायाधीश पी. जी. भोसले, विमा कंपनीचे वकील अ‍ॅड. के. ए. मुरचुट्टे, पॅनेल सदस्य अ‍ॅड. किरण पाटील, अ‍ॅड. पी. एस. स्वामी, सहाय्यक अधिक्षक व्ही. व्ही. कुलकर्णी, यशवंत जाधव, जमदाडे, बंडू मिसाळ आदी उपस्थित होते.