Wed, Jan 16, 2019 09:34होमपेज › Sangli › कोथळे प्रकरणात अॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

कोथळे प्रकरणात अॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

Published On: Dec 08 2017 3:24PM | Last Updated: Dec 08 2017 3:37PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात सरकारकडून अॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्याय व विधी विभाग कक्षाच्या अधिकारी वैशाली बोरूडे यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात आता पर्यंत पोलिस निरीक्षक युवराज कामटेसह १२ पोलिसांनी निलंबित करण्यात आले असून, जिल्ह्यातील बड्या पोलिस अधिकाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आली आहे. 

पोलिसांच्या आमानुष मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला असून, त्याचा मृतदेह आंबोली जाळून टाकण्याचा प्रकार युवराज कामटे याच्यासह काही पोलिसांनी केला आहे. संपूर्ण राज्य भरात गाजलेल्या या प्रकरणात आरोपी निलंबित पोलिसांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांच्या या कृत्याच्या निषेधार्थ सांगलीत बंदही पुकारण्यात आला होता.  तसेच पोलिस या प्रकरणातील तपासात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप अनिकेतच्या भावांनी केला होता. त्या विरोधात दोन्ही भावांनी आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता.