Wed, Jun 26, 2019 11:24होमपेज › Sangli › सांगली : अमोलची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

सांगली : अमोलची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

Published On: Sep 03 2018 11:49AM | Last Updated: Sep 03 2018 11:49AMवाळवा : पुढारी ऑनलाईन

दुचाकी अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने युवकाची रुग्‍णालयात सुरू असणारी मृत्युशी झुंज अखेर आज अपयशी ठरली. वाळवा तालुक्यातील मर्दवाडीच्या अमोल श्रीकांत सपकाळ या २७ वर्षीय तरुणाचे आज, सोमवारी सकाळी निधन झाले. मर्दवाडी-आष्‍टा रस्‍त्यावर दुचाकीवरून जात असताना शनिवारी सायंकाळी ७ वाजता अपघात झाला होता.

अमोल हा शनिवारी मारुतीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून मर्दवाडीवरून आष्‍ट्याला जात होता. यावेळी मर्दवाडीपासून काही अंतरावर गेला असता गाडीला कुत्रे आडवे आल्याने अपघात झाला. यात अमोलच्या डोक्याला मार लागला होता. त्याला कोल्‍हापुरातील खासगी रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

दरम्यान, आज सकाळी उपचारादरम्यान अमोलचे निधन झाले. अमोल याने शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र व वृत्तपत्रविद्या व संवादशास्‍त्र विभागातून पदव्युत्तर शिक्षण घेतले होते.