Wed, Sep 19, 2018 12:29होमपेज › Sangli › सांगली : मल निस्‍सारण केंद्रात पडून दोन ठार

सांगली : मल निस्‍सारण केंद्रात पडून दोन ठार

Published On: May 26 2018 8:55PM | Last Updated: May 26 2018 8:55PMसांगली : पुढारी ऑनलाईन

महापालिकेच्या मल निस्‍सारण केंद्रात पडून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. विठ्ठल शामलिंग शेरेकर (वय ४५, हनुमाननगर, सांगली) व उमाकांत प्रभाकर देशपांडे (५०, गणेशनगर, सांगली) अशी मृतांची नावे आहेत. तर संजय सदाशिव कोथमिरे (३०, कोगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर), संजय सदाशिव माळी (२४, कवलापूर, ता. मिरज) अशी जखमींची नावे आहेत.

जखमी दोघांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने शहरात नागरिकांतून संताप व्यक्‍त होत आहे.